भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले

nivruttidev mhane aisen mhanon naye | dhanya bhagyen pahe sant ale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥ आपुलेंज स्वहित करावें आपण । संतांच्या सन्माना चुकों नये ॥२॥ धन्य हो ते नर राहाती पंढरीं । श्वान त्यांचे घरीं सुखें व्हावें ॥३॥ नामदेवा संगें देवाचा हो वोढा । प्रेमें केला वेडा पांडुरंग ॥४॥ निवृत्ति म्हणे त्यासी न म्हणे आरे तुरे । बाई ठेवितां बरें डोई माते ॥५॥ म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण । आपणां दर्शन नलगे त्याचें ॥६॥