भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति मुक्ताईनें पाहुनि स्थळ डोळां । आलासे उमाळा ओसंडोनी

nivrutti muktainen pahuni sthal dolan | alase umala osandoni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति मुक्ताईनें पाहुनि स्थळ डोळां । आलासे उमाळा ओसंडोनी ॥१॥ तात आणि माता गेलीसे येथून । तेव्हां आम्ही लहान पांडुरंगा ॥२॥ निवृत्ति ज्ञानेश्वर कोरान्नाचें अन्न । सांभाळी सोपान मजलागीं ॥३॥ तुझ्या योगें हरि क्रमियेलें काळा । फुटलासे मेळा तापसांचा ॥४॥ नामा म्हणे यांचें कळविविलें मन । करी समाधान पांडुरंग ॥५॥