भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति मुक्ताईनें धरियेलें मौन । वटेश्वर सोपान त्यागियेला

nivrutti muktainen dhariyelen maun | vateshvar sopan tyagiyela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति मुक्ताईनें धरियेलें मौन । वटेश्वर सोपान त्यागियेला ॥१॥ समाधि पताकांची पडली सावली । उतरले खालीं योगीराज ॥२॥ पांडुरंगासंगें गेले ऋषीश्वर । सोपान वटेश्वरीं बैसविले ॥३॥ शिवाचा अवतार सद्‌गुरु निवृत्ति । मुक्ताबाई सखी तुम्हांपाशीं ॥४॥ अंतरीचें जाणतां वा पंढरीनाथ । आले अश्रुपात सोपानासी ॥५॥ सोपानाची बोळवण करितसे हरी । दीर्घा ध्वनी करी नामदेव ॥६॥