भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखळा । मार्ग हा मोकळा आम्हां जाला

nivrutti mhane urmi tutalya shrrunkhala | marga ha mokala amhan jala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखळा । मार्ग हा मोकळा आम्हां जाला ॥१॥ पांडुरंग पाश आवरिला आपला । म्हणोनि फुटला मार्ग आम्हां ॥२॥ आवरिली माया पुरातन आपुली । म्हणोनि आम्हां जाली बुद्धि ऐसी ॥३॥ नामदेवें मस्तक ठेवियलें पायीं । आतां खेड कांहीं करूं नका ॥४॥