भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य नेम आह्मां चिंतन श्रीरामा । आणिक उपमा नेघों नेघों

nitya nem ahman chintan shrirama | anik upama neghon neghon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य नेम आह्मां चिंतन श्रीरामा । आणिक उपमा नेघों नेघों ॥१॥ वळघलों हरि भूत भाव निर्धारी । दिसे चरा-चरीं हरिरूप ॥२॥ जें जें पडे दृष्टी आणिक नाहीं सृष्टी । हरिरूपीं भेटी हेंचि दिसे ॥३॥ नामा ह्मणे विठ्ठल सर्वभूतीं आहे । आणिक उपाय न लगती ॥४॥