भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्धन धनातें कीं आंधळे लोचनातें । मयूर धनातें जेंवि भावी

nirdhan dhanaten kin andhale lochanaten | mayur dhanaten jenvi bhavi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्धन धनातें कीं आंधळे लोचनातें । मयूर धनातें जेंवि भावी ॥१॥ पारधियें पाडस धरियलें वनीं । तें चिंती जननि रत्रंदिवस ॥२॥ तैसा तुझा छंद लागो कां गा देवा । माझिया वा जीवा केशिराजा ॥३॥ सर्पें डखिलें तें स्मरतो गारोडी । पुरीं जातां सांगडी मन चिंती ॥४॥ रोगी वैद्यातें बोलावूं धाडी । पडिले बांद-वडी सुटका इच्छी ॥५॥ बोळविली बाला ते मनीं वाहे कुवसा । कां रसज्ञु जैसा औषध गिवसी ॥६॥ धेनुकारणें व्याकुळ होय वत्स । तें दशदिशेस अवलोकितें ॥७॥ निचेतन देह प्राण असे अलक । धाय-वट उदक स्मरे वनीं ॥८॥ चकोरें मिळोनि चंद्रा जेंवि ध्याती । इंद्रिया निवृत्ति कैं होईल ॥९॥ पक्षिणीचें पिल येऊनि द्बाराजवळें । मुख पसरी कोंवळें आलोहित ॥१०॥ नामा ह्मणे म्यां आन नाहीं जाणितलें । मज पुरे इतुकलें केशिराजा ॥११॥