भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंतर तुह्मीं करावा विचार । भवाब्धीचा पार होय कैसा

nirantar tuhmin karava vichar | bhavabdhicha par hoy kaisa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निरंतर तुह्मीं करावा विचार । भवाब्धीचा पार होय कैसा ॥१॥ जन्म गेलें वांयां विषयाचे संगें । भुलले वाउगे माया मोहें ॥२॥ अवघा करितां संसाराचा धंदा । वाचे वदा सदा हरि-नाम ॥३॥ सर्वभावें एका विठोबातें भजा । आर्ते करा पूजा हरि भक्त ॥४॥ सर्व सुख होई तुह्मांला आपैतें । न याल मागुते गर्भवासा ॥५॥ नामा ह्मणे तुह्मीं विचारूनि पहा । सर्वकाळ रहा सतसंगें ॥६॥