भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंतर नाम जपे । पिता प्रर्‍हादास कोपे । उदरा आला वैरिरूपें । ह्मणवूनि धायीं त्रासिला

nirantar nam jape | pita prar‍hadas kope | udara ala vairirupen | hmanavuni dhayin trasila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निरंतर नाम जपे । पिता प्रर्‍हादास कोपे । उदरा आला वैरिरूपें । ह्मणवूनि धायीं त्रासिला ॥१॥ कोपें कोपला नर-हरी । कवण तयातें सांवरी । खटखटा वाजती दांतोरी । दैत्यावरी । उठावला ॥२॥ हांक देऊनि अवचितीं । आंदोळली त्रिजगती । समुद्रपाणी उसळती । उलथों पाहती गिरिवर ॥३॥ सिंहवदन प्रग-टला । मर्गजू अवचित उठला । भेणें वासुकी मोवाळला । गजब-जिला पाताळीं ॥४॥ जैसा प्रळयांतकाळिंचा मेघु । तैस गडब-डिला वेगु । अरे मर्गजाच्या खांबीं सवेगु । क्षणामाजीं प्रगटला ॥५॥ केला भक्तांचा कुडावा । शिक लविली दानवा । नामया -स्वामि वोळंगावा । नरहरि विसांवा भक्तांचा ॥६॥