भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंजनीं वनीं पाषाण पैं व्हाव्वें । परी जन्मा न यावें मागत्याच्या

niranjanin vanin pashan pain vhavven | pari janma na yaven magatyachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निरंजनीं वनीं पाषाण पैं व्हाव्वें । परी जन्मा न यावें मागत्याच्या ॥१॥ राजाचें लेकरूं पांघरे वाकळ । तेव्हां तें सकळ लाज कोणा ॥२॥ पोसवेना तरी दवडुनि देई देवा । नामा तुज केशवा विनवितसे ॥३॥