भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीर समुद्र तो कोण । कोठें क्षीराब्धि आसन

nir samudra to kon | kothen kshirabdhi asan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नीर समुद्र तो कोण । कोठें क्षीराब्धि आसन ॥१॥ दधि समुद्र कोण्याठायीं । खारा समुद्र कोण्या गृहीं ॥२॥ रत्न समुद्र तो कोण । कोठें मदनाचें आसन ॥३॥ मन समुद्र कोठें आहे । नामा म्हणे शोधून पाहे ॥४॥