भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयासारिखें निधान तुझिये कुसीं । धन्य तूं वो होसी जगामाजीं

namayasarikhen nidhan tujhiye kusin | dhanya tun vo hosi jagamajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयासारिखें निधान तुझिये कुसीं । धन्य तूं वो होसी जगामाजीं ॥१॥ धन्य याचें सुख देखियेलें डोळां । प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक ॥२॥ धन्य तुझें कुळ धन्य तुझा वंश । दीपासवें प्रकाश दिसे जेवीं ॥३॥ धन्य तुझी काया धन्य वाचा मन । करविलें स्तनपान नामयासी ॥४॥ धन्य हा दिवस तुवां केलें सार्थक । खेळविलें कौतुकें नामयासी ॥५॥ धन्य तुझें भोजन नाहीं नाम्याविण । धन्य उदकपान केलें तुवां ॥६॥ धन्य विश्रांतीसी केलें त्वां शयन । वोसंगा घेऊन नामयासी ॥७॥ धन्य तुझे कर कुरवाळिला नामा । धन्य तो संभ्रमा स्नेह तुझा ॥८॥ धन्य कृपदृष्टीं नाम्यातें पाहिलें । केस कुर्वाळिले बाळपणीं ॥९॥ ऐसी तूं वो धन्य जन्मोनियां धन्य । तुझें नाम धन्य मिरवत ॥१०॥ धन्य तुझा नामा ज्याची भेटी आम्हां । धन्य त्याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥