भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचें लेखन श्वानाचिये कानीं । धांवतसे घाणी चर्माचिये

namachen lekhan shvanachiye kanin | dhanvatase ghani charmachiye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचें लेखन श्वानाचिये कानीं । धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥ विंचू ह्मणतसे मी उदार दाता । उचित हें देतां नलगे वेळ ॥२॥ सूकर ह्मणे गृहस्थ भला । शेखीं तयाचा डोळा विष्ठेवरी ॥३॥ नापिक ह्मणे माझी । नांदणूक मोठी । धोकटिं मा-झारीं जन्म गेला ॥४॥ नामा ह्मणे माझी वासना हे खोती । विठ्ठल चरणीं मिठी पडली असे ॥५॥