भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको नको मना हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी वांयांविण

nako nako mana hindon darodarin | kashta jhale bhari vanyanvin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नको नको मना हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी वांयांविण ॥१॥ कल्पना सांडोनि संतासंगें राहीं । सर्व त्यांचे पायीं सुख आहे ॥२॥ ज्याचिया दर्शनें शोक मोह जळे । पाप ताप पळे कळभय ॥३॥ जवळीच देखती पायाळावांचून । तें सुख निधान वैकुंठींचें ॥४॥ नामा ह्मणे आली शेवटील घडी । तों वईं आवडी हाचि एक ॥५॥