भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पाहें गे माय विठईविण डोळां । सर्वस्वें कंटाळा आणिकांचा

na pahen ge may vithaivin dolan | sarvasven kantala anikancha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न पाहें गे माय विठईविण डोळां । सर्वस्वें कंटाळा आणिकांचा ॥१॥ विठोबाविण कांहीं नायकें मीं कानीं । जडली चरणीं चित्तवृत्ती ॥२॥ आणिकांचे मार्गीं न चालोत पाय । जीव वोढे सय पांडुरंग ॥३॥ नामा म्हणे करीं आणिकांची पूजा । न करीं गरुडध्वजा वांचूनियां ॥४॥