भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करू आह्मीं तैसें घेईं आतां भाक । अंतरीं नि:शंक झालो सर्व

na karu ahmin taisen ghein atan bhak | antarin ni:shank jhalo sarva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न करू आह्मीं तैसें घेईं आतां भाक । अंतरीं नि:शंक झालो सर्व ॥१॥ तुह्मीं आह्मां साक्षी असे सदाशीव । येथें दुजा भाव धरूं नको ॥२॥ पिऊनियां पाणी न येऊं तुजपाशीं । तरी घडे आह्मांसी सर्व पापें ॥३॥ जातीचा ब्राह्मण न करी ब्रम्हकर्म । तो जैसा अधम तैसे आह्मी ॥४॥ स्वामिद्रोही आणि विश्वास-घातकी । तो पडे ज्या नरकीं तेथें पडो ॥५॥ नामा म्हणे ऐसी वाहोनियां आण । धरीले चरण पारध्याचे ॥६॥