भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूर्ख बैसले कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी

murkha baisale kirtanin | na kale arthachi karani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मूर्ख बैसले कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥ घुबड पाहे भलतीकडे । नाइके नामा चे पवाडे ॥२॥ पाहूं इच्छी पर-नारी । चित्त पादरक्षावरी ॥३॥ नामा म्हणे सांगूं किती । मूढ सां-गितलें नाइकती ॥४॥