भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं

mungyanchiye vivarin lagalise ag | pudhen ani magen jalen nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं ॥१॥ राही रुक्माई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥ उभारिल्या गुढिया आणि तोरणें । छाया सुदर्शन धरियेलें ॥३॥ नारा विठा गोंदा भेटला महादा । उभे जागोजागा राहिलेती ॥४॥ विसोबा खेचर चांगा वटेश्वर । केला नमस्कार अवघियांनीं ॥५॥ गोरा कुंभार सांवता माळी । नामा तळमळी वत्सा ऐसें ॥६॥