भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगी व्याली शिंगी झाली तिचेम दूध किती । सतरा रांजण भरून गेले पेले बारा हत्ती

mungi vyali shingi jhali tichem dudh kiti | satara ranjan bharun gele pele bara hatti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुंगी व्याली शिंगी झाली तिचेम दूध किती । सतरा रांजण भरून गेले पेले बारा हत्ती । ॥१॥ आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥ध्रु०॥ लटिकें गेलें कटके तेथें गाडग्या एवढें राळें । उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीयेवढे डोळे ॥२॥ शेळी करी घुसळण तेथें मांजर काढी लोणी । उंदीर गेले देशांतरा ताकें भरल्या गोणी ॥३॥ पाण्यांत कांसव गीत गाय वनांत कोल्हा नाचे । सावज मनीं संतोषला खोकड पुस्तक वाचे ॥४॥ कांतणी घरीं लग्न लागलें सरडा कणीक कांडी । बागुल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी ॥५॥ बाभुळीचे खोडीं माशानें केलें कोटें । सशानें सिंह ग्रासिला बेडुक आले लोटें ॥६॥ विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती । लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती ॥७॥