भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा

mungi umaga te mungi umaga | mungiche mukhin tniveni ganga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा ॥१॥ उदकाचें टवळें मसीची मात । अंधारी मुंगीनें तेथें लाविली ज्योती ॥२॥ अवघें आकाशा मुंगीये मागें । मुंगीये संसार सांडिला मागें ॥३॥ विष्णुदास नामा मुंगीये मागें । मुंगी उमगली खेचासंगें ॥४॥