भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्ताई उदासी जाली असे फार । आत्मा हें शरीर रक्षूं नये

muktai udasi jali ase phar | atma hen sharir rakshun naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुक्ताई उदासी जाली असे फार । आत्मा हें शरीर रक्षूं नये ॥१॥ त्यागिले आहार अन्नपाणी सकळीं । निवृत्तिराज तळमळी मनामाजीं ॥२॥ गंधर्वा सुरगण उठले सहमेळा । गेले ते वेरूळा अवघेजण ॥३॥ वेरुळाचा महिमा सांगे ह्रषिकेशी । जवा आगळी काशी म्हणोनियां ॥४॥ वेरुळाची यात्रा केली यथासांग । मग पांडुरंग विघते जाले ॥५॥ चालिले श्रीरंग वैष्णवांचे भार । पाहावें तापीतीर नामा म्हणे ॥६॥