भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं नाम हातीं टाळी । दया नुपजे कोणे काळीं

mukhin nam hatin tali | daya nupaje kone kalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुखीं नाम हातीं टाळी । दया नुपजे कोणे काळीं ॥१॥ काय करावें तें गाणें । धिक्‍ धिक्‍ तें लजिरवाणे ॥२॥ हरिदास म्हणोनि हालवी मान । कवडीसाठीं घेतो प्राण ॥३॥ हरिदासा़चे पायीं लोळे । केशीं धरोनि कापी गळे ॥४॥ नामा म्हणे अवघे चोर । एक हरिनाम हें थोर ॥५॥