भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं । विजुचिया परी कीळ जालें

motiyancha chura phenkila ambarin | vijuchiya pari kil jalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं । विजुचिया परी कीळ जालें ॥१॥ जरी पितांबरें नेसविलीं नभा । चैतन्याचा गाभा नीलबिंदू ॥२॥ तळीपरि पसरली शून्याकार जाली । सर्पाचिये पिली नाचूं लागे ॥३॥ कडकडोनि वीज निमाली ठायिंचे ठायीं । भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥४॥ ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट । ओळखिलें अविट आपुलेंपण ॥५॥