भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणा श्रीराम जयराम । भवसिंधु तारक नाम

mhana shriram jayaram | bhavasindhu tarak nam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणा श्रीराम जयराम । भवसिंधु तारक नाम ॥१॥ नाम पतितपावन । नाम जीवांचे साधन ॥२॥ नाम शिवाचें ध्यान । नाम नारदा गायन ॥३॥ नामा म्हणे हरिचें नाम । नाम तारक परब्रह्म ॥४॥