भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेलें जित्यासी सांगे गोष्टी । आंधळें ओंवी सुवर्णाच्या गांठी

melen jityasi sange goshti | andhalen onvi suvarnachya ganthi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मेलें जित्यासी सांगे गोष्टी । आंधळें ओंवी सुवर्णाच्या गांठी । पांगुळ लागे पवनाच्या पाठीं । बाळका पोटीं माय वाढे ॥१॥ थोटयानें धवलार रचियेलें । मुकें पुराण सांगूं बैसलें । सवेंचि बहिरें ऐकों ठेलें । वेडें हांसलें शहाणीयासी ॥२॥ आणिक एक नवल सांगूं काई । जीत वाघ शलभानें भक्षिला पाहीं । मुंगीनें पर्वत उचलिला बाहीं । माशी करी साही सूर्यासी पैं ॥३॥ मृदंगें वाहिला गुरव राणा । वांझेच्या स्तनीं संचरला पान्हा । माथां फुलें खोऊं नाचे दवणा । जाण सुजाणा न कळेची ॥४॥ मुरकुटें सगळा सागर शोषिला । माशानें पारधी मारिला । सशानें सिंह भोवंडिला । वेदांपुराणां न कळेची ॥५॥ हें तुम्ही म्हणाल उमानें । हें तंव उफराटें द्दष्टी पहाणें । विष्णुदास नामा म्हणे । अनुभवी या खुणा जाणती ॥६॥