भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेचा कळवळा मायाची जाणे । तैसें मी तान्हें माऊलिये

mayecha kalavala mayachi jane | taisen mi tanhen mauliye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मायेचा कळवळा मायाची जाणे । तैसें मी तान्हें माऊलिये ॥१॥ विठठल श्रीरंग डोळस प्रसन्न । नित्य अमृतघन वोळला सदा ॥२॥ जननी जनक तूंचि वो मुकुंद । नाम हें गोविंद शुद्धरसु ॥३॥ येई वो केशवे नित्य नामरुपें । मी तुज आलापें आळवित ॥४॥ माधवा श्रीधरा वेगीम येई त्वरें । मज वो नावरे प्रेमवेधु ॥५॥ नामा म्हणे तूं जीवन आमुचें । नित्य केशवाचें प्रेम मज ॥६॥