भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायभूमि पाहूं यांची आम्हीं डोळां । चलावें गोपाळा सहजासहज

mayabhumi pahun yanchi amhin dolan | chalaven gopala sahajasahaj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मायभूमि पाहूं यांची आम्हीं डोळां । चलावें गोपाळा सहजासहज ॥१॥ भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि । तयाची समाधि आपेगांवीं ॥२॥ आपेगांवीं आले देव ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥३॥ धन्य यांचें कुळ धन्य यांचा वंश । धन्य यांचें कुशीं योगिराज ॥४॥ नामा म्हणे आम्हां दाविलें नारायणें । जालीं चौघीजणें याचि क्षेत्रीं ॥५॥