भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापाची ते सांडुनियां आस । धरिली तुझी कांस पांडुरंगा

mayabapachi te sanduniyan as | dharili tujhi kans panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मायबापाची ते सांडुनियां आस । धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥१॥ झणीं पांडुरंगा उपेक्षिसी मातें । तरी हांसतील तूंतें संतजन ॥२॥ नामा म्हणे तुझीं पाउलें समान । तेथें माझें मन स्थिरावलें ॥३॥