भजनी मालिका
← भजनांकडे परत

माय मेली बाप मेला । आतां सांभाळीं विष्ठला

may meli bap mela | atan sambhalin vishthala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माय मेली बाप मेला । आतां सांभाळीं विष्ठला ॥१॥ मी तुझें गा लेकरूं । नको मजशीं अव्हेरूं ॥२॥ मतिमंद मी तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥ तुजविण सखे कोण । माझें करील संरक्षण ॥४॥ अंत किती पाहासी देवा । थोर श्रम झाला जीवा ॥५॥ सकळ जिवाच्या जीवना । म्हणे जनी नारायणा ॥६॥