भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्गीं चालतां उगलें न चालावें । वाचेसी ह्मणावें रामकृष्ण

margin chalatan ugalen na chalaven | vachesi hmanaven ramakrushna

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मार्गीं चालतां उगलें न चालावें । वाचेसी ह्मणावें रामकृष्ण ॥१॥ हरि बा हरि हरि मुकुंद मुरारी । माधव नरहरि केशिराज ॥२॥ ऐसा छंद वाचे सर्वकाळ जयां । नामा ह्मणे तयां दोष कैंचे ॥३॥