भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्गशीर्ष मासीं कात्यायनी व्रत । कुमारी समस्त आचरती

margashirsha masin katyayani vrat | kumari samasta acharati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मार्गशीर्ष मासीं कात्यायनी व्रत । कुमारी समस्त आचरती ॥१॥ अरुणोदयीं येती कालिंदीचे तीरीं । गाती त्या सुंदरी कृष्णजीला ॥२॥ सिकतेची मूर्ति करूनि देवीची । पूजाअर्चा तिची करिताती ॥३॥ जोडोनियां कर करिताती स्तवना । ऐकें विझापना आदिमाये ॥४॥ नंदाचा नंदन देईं आह्मां पती । नामा ह्मणे येती स्वस्थळासी ॥५॥