भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्गही राहिला जाऊं कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे

margahi rahila jaun konikade | amish na jode kay kije

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मार्गही राहिला जाऊं कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥ चिंताज्वरें फार तापलें अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्यें ॥२॥ रिक्त जाऊं तरी नाहीं कांहीं घरीं । वाट पाहे घरीं दारा-पुत्र ॥३॥ पाहूम जातां काहीं नाठवे विचार । तेणें स्थिरस्थिर पाय टाकी ॥४॥ नामा ह्मणे तेव्हां देखे सरोबर । कांहींसा विचार करूं लागे ॥५॥