भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांजरें केली एकादशी । इळवरी होतें उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरु

manjaren keli ekadashi | ilavari hoten upavasi | yatna karitan paranyasi | dhanuni givasi undiru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मांजरें केली एकादशी । इळवरी होतें उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरु ॥१॥ लांडगा वै-सला ध्यानस्थ । तोंवरी असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥२॥ श्वान गेले मलकार्जुना । देह कर्वतीं घातलें जाणा । आलें मनुष्यदेहपणा । परि खोदी न संडी आपुली ॥३॥ श्वानें देखिला स्वयंपाक । जोंवरि जागे होते लोक । मग नि-जलिया नि:शंक । चारी मडकीं फोडिलीं ॥४॥ वेश्या झाली पति-व्रता । तिचा भाव असे दुश्रिता । तिसी नाहीं आणिक चिंता । परद्वारावांचुनि ॥५॥ दात्यानें केली समाराधना । बहुत लोक जे-विले जाणा । परि न संडी वोखटी वासना । खटनट चाळितसे ॥६॥ ऐशा प्रकारच्या भक्ति । असती त्या नेणों किती । एक ओळंगा लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥७॥