भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांजराचे डोळे गेले । उंदिर धराया तळमळे

manjarache dole gele | undir dharaya talamale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मांजराचे डोळे गेले । उंदिर धराया तळमळे ॥१॥ तैंसा नव्हेरे संन्यास । धांवे विषयावरी हव्यास ॥२॥ वेश्या झाली पट्टराणी । स्मरीना पूर्वील करणी ॥३॥ सर्प प्रतिवर्षीं पालटे । परि अहंकार न पालटे ॥४॥ पहिलें पोशिलें मर्कटा । कोणें शिकविल्या चेष्टा ॥५॥ म्हणे नामयाचा विठ । विज्र लागो या ल्ल्लाटा ॥६॥