भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन जाते जेथे दुःख दाखवी तेथे। नामावाचुनी वाचा बंद करी

man jate jethe duhkh dakhavi tethe| namavachuni vacha band kari

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
मन जाते जेथे दुःख दाखवी तेथे। नामावाचुनी वाचा बंद करी ॥१॥ तुजवीण चैन नाही चिदंबरा पायें या सत्वरा चिदंबरा ||२॥ विठाबाईचा अंत कीती पाहासी देवा लवकरी हो यात्रावा स्वामीराया ॥३॥ का नये करुणा स्वामी ब्रह्मपूर्णा कृपेचा तू राणा म्हणवीसी ॥४॥ धावा करीतो स्वामी रात्रदीस तुझे। का नये रे माझे करुणा तुला ॥५॥ विठाबाईंचा अंत जवळ आला स्वामी कुठे गेला तुम्ही चिदंबरा ।।६।।