भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया मनाचें हिंडणें जे जे ठायीं । तेथें तेथें राही पांडुरंगा

majhiya manachen hindanen je je thayin | tethen tethen rahi panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझिया मनाचें हिंडणें जे जे ठायीं । तेथें तेथें राही पांडुरंगा ॥१॥ भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी । दावीं दृष्टीभरी निरंतर ॥२॥ पुंडलिकासमोर लक्ष निरंतरीं । तैसाची अंतरीं येऊनि राहे ॥३॥ कटीं कर विटे समचरण गोमटें । पाहतां अति निकट हेंचि ध्यान ॥४॥ पुरवीं माझी आस तूं बाप माउली । करीं मज साउली पद्मकरें ॥५॥ नामा म्हणे झणें करिसी उदास । होती कासावीस प्रान माझे ॥६॥