भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया बापासी तुझाचि विश्वास । म्हणवी तुझा दास अंतरंग

majhiya bapasi tujhachi vishvas | mhanavi tujha das antarang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझिया बापासी तुझाचि विश्वास । म्हणवी तुझा दास अंतरंग ॥१॥ वृत्तिसहित मन ठेवुनी तुझ्यापाय़ीं । तुजपरतें कांहीं जाणेचिना ॥२॥ तों आम्हांलागीं शब्दें न पुससी । विसरोनी गेलासी दीनानाथा ॥३॥ जागे ठाणांतरी पंढरी चोहोटा । राखे दारवंटा रात्रंदिवस ॥४॥ छत्रचवर धरूं हाडपी डोळे करूं । जाणवी आवसरू सेवा विधी ॥५॥ शरीर प्राणाचा देऊनियां बळी । धरिले ह्रदयकमळीं चरण तुझे ॥६॥ विठा म्हणे तुज नाहीं आठवण । सहज तूं निर्गुण पंढरिराया ॥७॥