भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया बापाची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा

majhiya bapachi mirashi ga deva | tujhi charanaseva panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझिया बापाची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपास पारणें राखें दारवंटा । केला भाग्य वांटा आम्हांलागीं ॥२॥ तुजपरतें दुजें नेणें आणिक कांहीं । देखें सर्वांठायीं रूप तुझें ॥३॥ तुझ्या सुखें धाला तुजमाजी निवाला । आपुला विसरला देहभाव ॥४॥ आम्हांसी घातलें तुझीये आभारी । विठा म्हणे अंगिकारीं नारायणा ॥५॥