भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज चालतां आयुष्यपंथें । तारुण्यवन पातलें तेथें

maj chalatan ayushyapanthen | tarunyavan patalen tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मज चालतां आयुष्यपंथें । तारुण्यवन पातलें तेथें । मदमछरादि श्वापदें बहुतें । आलीं कळकळीत मजपाशीं ॥१॥ तीं धांवती पाठोपाठीं । पाहे तंव विषयाचे घाटीं । काम क्रोध व्याघ्रांची दाटी । देखोनि पोटीम रिघालें भय ॥२॥ मगा स्वधर्ममार्गीं रिघालों । तंव अहंकारतस्करें आकळिलों । राहें राहें म्हणोनि उभा केलों । तेणें शिंतरलों स्वामिया ॥३॥ जंव क्षण एक उघडिले डोळे । पाहे तंव कंठ दाटला व्याळें । मायमोहसर्पीं डंखिलें । त्यांचिये गरळें झळंबलों ॥४॥ जंव न पवे शेवटील लहरी । तंव धांव धांव उपाव करी । विष्णुदास नामा धांवा करी । माझा कैवारी केशिराजु ॥५॥