भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा उत्साव त्रयोदशी । केली त्या ज्ञानदेवासी

maha utsav trayodashi | keli tya dnyanadevasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
महा उत्साव त्रयोदशी । केली त्या ज्ञानदेवासी । मग नामा म्हणे विठोबासी । चरण धरुनियां ॥१॥ समाधिसुख दिधलें देवा । ज्ञानांजन आळंकापुरीं ठेवा । आजानवृक्षी बीज वोल्हावा । या ज्ञानंजनासी ॥२॥ कृपा आली विठठलासी । म्हणे ज्ञानदेवा परियेसी । तीर्थ भागीरथी अहर्निशीं । तुज नित्य स्नानासि दिधलीसे ॥३॥ इंद्रायणी दक्षिणवाहिनी । भागीरथी मणिकर्णिका दोन्ही । इया मिळालिया त्रिसंगमीं । पुण्यभूमि तुझिये ॥४॥ येथें जरी नित्य स्नान घडे । तरी नित्य वैकुंठवास जोडे । तुज नाहीं नाहीं रे कुवाडे । मी वाडें-कोडें उभा असे ॥५॥ येथें हरिकथा नाम वाचे । जो उच्चारिल विठठलाचे । तयासी पेणें वैकुंठीचें । दिधलें साचें तिअक्षरीं ॥६॥ आणिक ऐके रे ज्ञानराजा । जो या सिद्धेश्वरीं करील पूजा । तो अंतरंग सखा माझा । मुक्ति सहजा जाली त्यासी ॥७॥ नामा म्हणे ऐसें अंतरंग । कैसा वोळला पांडुरंग । ज्ञानदेवीम समाधि सांग । हरिपाठ कीर्तनें ॥८॥