भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग संतोष जाला हरिभक्तां । ज्ञानदेव झाला बोलता

mag santosh jala haribhaktan | dnyanadev jhala bolata

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग संतोष जाला हरिभक्तां । ज्ञानदेव झाला बोलता । निवृत्तीसी म्हणे तुम्ही जावें आतां । त्र्यंबका सीखरीं ॥१॥ करुनि नमस्कार हरिसी । वेगीम यावें वैकुंठासी । नित्य हरिचरणापासीं । तुम्हीं आम्हीं सोपान ॥२॥ मुक्ताई म्हणे ज्ञानदेवा । मज विठोबासी निरवा । मजवरी लोभ असों द्यावा । रुक्मिणीमाता आदिकरुनि ॥३॥ पुंडलिकासी निरवावें । समस्तांसी क्षेम सांगावेम । कृपादृष्टी अवलोकावेम । मतलागीम ज्ञानदेवा ॥४॥ ज्ञानें करुनि विज्ञान । भक्तीसी करावें निरुपण । द्यावे समाधिसंजीवन । तुम्ही यावें शीघ्रवत ॥५॥ निवृत्तीने दिधलें उत्तर । आम्ही जाऊं वेगवत्तर । सोपानासी मार्गीं निरंतर । समाधीसी बैसवूनि ॥६॥ तंव बोलिला यादवराणा । तुम्ही सांगितल्या समाधीच्या खुणा । परी नामयावरी जाणा । माझी कासवदृष्टी ॥७॥ नामा म्हणे विठोबासी । तूं स्वामि दीनाचा होसी । गेलें निधान ज्ञानदेव दाखविशी । मज नयनीं प्रत्यक्ष ॥८॥