भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग प्रश्न आदरिला । नामा फुंदों जो लागला

mag prashna adarila | nama phundon jo lagala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग प्रश्न आदरिला । नामा फुंदों जो लागला । कां गा ज्ञानदेवो गेला । मज सांडुनियां ॥१॥ कैसा होय तुझा दास । कैसी पाहों तुझी वास । ज्ञानाकारणें कासाविस । जीव माझा होतसे ॥२॥ देव म्हणे नामयासी । तूं झणीं कासाविस होसी । तूं रे तयातें नेणसी । तें कैसें आईक पां ॥३॥ ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरु । ज्ञानदेव भवसिंधुतारुं । प्रत्यक्ष रुपें पैं असे ॥४॥ ज्ञानदेवीम ज्ञानगम्य । ज्ञानदेवीं ज्ञानधर्म्य । ज्ञानदेवी ज्ञाननेम । सर्वथैव पैं असे ॥५॥ ज्ञानदेव हाचि देव । ज्ञानदेवीम धरलिया भाव । ज्ञान होईल जीवां सर्व । यासी होय समाधान । जीव शिवीं परिपूर्ण । एके रात्रीं कीर्तन केलिया ॥७॥ झणें तूं व्याकुळ होसी चित्तें । मनीं आठवी गा मातेम । नामस्मरणें एका चित्तें । रामकृष्ण गोविंद ॥८। नामा म्हणे तूं समर्थ होसी । अर्जुनीं प्रीति करिसी । हें सांगितलें व्यासीं । एकादशाध्यायीं ॥९॥ तैसा पावे तूं विश्व्शा । विश्वरुपा जगन्निवासा । मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारनें ॥१०॥ तरी तूं गा युगानयुगीम । असशी भक्तांचिया संगीं । आम्ही विनटलों पांडुरंगीं । रंगारंगीं विठठलीं ॥११॥ एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख । तें करी निर्विशषे । नामा येतसे काकुळती ॥१२॥