भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग पंढरीनाथ म्हणे नामयासी । तूं जाई गोणाईसी घेऊनियां

mag pandharinath mhane namayasi | tun jai gonaisi gheuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग पंढरीनाथ म्हणे नामयासी । तूं जाई गोणाईसी घेऊनियां ॥१॥ अतिशय कांज इणें मांडिलासे फार । मातेसि निष्ठुर होऊं नये ॥२॥ स्तनपान देऊनि मोहें पाळिलासी । अंतर तियेसी देऊं नये ॥३॥ नामा म्हणे शरण आलों जिच्या भेणें । तिचे हातीं देणें उचित नव्हे ॥४॥