भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग नारदातेम पुसे सत्यभामा देवी । विस्मयो माझ्या जीवीं अति वाटे

mag naradatem puse satyabhama devi | vismayo majhya jivin ati vate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग नारदातेम पुसे सत्यभामा देवी । विस्मयो माझ्या जीवीं अति वाटे ॥१॥ सांडोनियां थोरी देव मुगुटमणी । नाचतो कीर्तनीं संतांपुढे ॥२॥ तरी कोणिये जन्माचें काय काय याचें । घेतलें नाम्याचे ऋण देवें ॥३॥ एका पुंडलिकाचेनि पांगें येणें हो श्रीरंगें । अठ्ठावीस युगें उभ्या गेलीं ॥४॥ न पाहे परतोनी अझुनी पाठिमोरा । न बोले निष्ठुरा वचन कांहीं ॥५॥ तरी कोण प्रीति देव कोण्या ऋणानुबंधें । राखितो आनंदें बळिचें द्वार ॥६॥ विकिला पायिक कायामनें वाचा । जाला पांडवांचा वेळाइतु ॥७॥ जें जें जया आवडे तें तें धरोनी रुप । पाववी संकल्प सिद्धी त्यांचे ॥८॥ एकला एकटु एकलेनि जीवें । भक्तांचे करावेम सकळ काज ॥९॥ ऐसे भक्त अपार आहेत भूमंडळीं । किती लागावळी असेल त्यांची ॥१०॥ म्हणोनि माझ्या जिवीं वाटे थोर खंती । स्वामीतेम शिणविती युगायुगीं ॥११॥ भक्तांचे आवडी त्यजिलें वैकुंटभुवन । चित्तीं अमृतपान न वाटे गोड ॥१२॥ अखंड आवडे संतांची संगती । बैसोनि एकांतीं घेती सुख ॥१३॥ ऐसी इहीं चाळविलें वैष्णवीं । आमुचे घर गोसावीं भुलविलें ॥१४॥ त्यां सकळहुनि पढियंता देवा एकु नामा । भक्तिभावें प्रेमा दिधला त्यासी ॥१५॥