भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग हांसोनि सकळी । पाहूं देव कैसा बळी

mag hansoni sakali | pahun dev kaisa bali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग हांसोनि सकळी । पाहूं देव कैसा बळी ॥१॥ आले नामदेवा घरीं । प्रेमें भुललासे हरीं ॥२॥ घाली जातिया बैरण । गाय आवडीचें गाण ॥३॥ पुढें देखे ज्ञानेश्वर । देव झालसे घाब्र ॥४॥ जनी म्हणे पंढरिनाथा । जाय राउळासी आंतां ॥५॥