भजनी मालिका
← भजनांकडे परत

मध्यान्हकाळीं मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा तें

madhyanhakalin mag harisi gheuni | karitase bhojan yashoda ten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मध्यान्हकाळीं मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा तें ॥१॥ भोजन करूनि पलंगीं निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥२॥ यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥ नेत्रासी पदर लावोनि रडत । अंतरीं अनंत आठ-वोनि ॥४॥ करुणा शब्द तिचा ऐकोनि श्रवणीं । उठला चक्रपाणी तेथोनियां ॥५॥ जावोनियां राधा धरिली पदरीं । तिजलागीं हरि समजावित ॥६॥ संसारासी माझ्या पडियेलें पाणी । ऐसें चूक्र-पाणी तुवां केलें ॥७॥ इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरिसी धुंडीत तयेवेळीं ॥८॥ एखादी हा कळी घेऊन येईल आतां । पाहातसे माया चहूंकडे ॥९॥ पाउलाचा माग चालिली काढीत । पावली त्वरित यमुनातीरा ॥१०॥ राधा तयेवेळीं ह्मणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥११॥ मातेसी देखूनि गडबडां लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥१२॥ मातेसी ह्मणत चोरोनि कंदूक । घेऊनियां देख आली येथें ॥१३॥ माता ह्मणे कां वो यासी रड-विसी । चेडुं तूं हरिसी देईं वेगीं ॥१४॥ मामी हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशीं जाण चेंडु नाहीं ॥१५॥ कृष्ण ह्मणे माते झाडा घेईं आतां । कंदूक तत्त्वतां निघेल पैं ॥१६॥ वस्त्र जंव झाडीत राधा तयेवेळीं । पडिला भूतळीं कंदूक तो ॥१७॥ ऐसें देखोनियां लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा ह्मणे ॥१८॥