भजनी मालिका
← भजनांकडे परत

मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी

machchha jaisa jalavanchoni tadaphadi

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥ अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥ तृषितांसी जैसें आवडे जीवन । तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥ बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं । ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥