भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा

lolo lagala ambecha | vithabai anandicha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥१॥ आदि ठाणें पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥२॥ गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देईं मला ॥३॥ शुद्ध देखोनियां भाव । पोटीं आले नामदेव ॥४॥ दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥५॥