भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोभियाचे घरीं लटिकेचि उपवास । न मरे ह्रषिकेश म्हणती जगीं

lobhiyache gharin latikechi upavas | na mare hrashikesh mhanati jagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लोभियाचे घरीं लटिकेचि उपवास । न मरे ह्रषिकेश म्हणती जगीं ॥१॥ तूं तंव भावाचा अंकुर जी देवा । लटिका मी पहावव दास तुझा ॥२॥ लटिकी पक्षियातें बोभाये कुंटणी । ते त्यां माझी म्हणोनि अंगिकारिली ॥३॥ लटिका अजामेळ पुत्राचेनि मोहें । सोडविला पाहे कैसा तुवां ॥४॥ त्या अवघ्याहुनि मी लटिका सहस्त्र गुणें । तारूनि कीर्ति करणें म्हणे नामा ॥५॥