भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्षवरी बिल्वदळें माथा वाहे । आनंद न समाये महादेवा

lakshavari bilvadalen matha vahe | anand na samaye mahadeva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लक्षवरी बिल्वदळें माथा वाहे । आनंद न समाये महादेवा ॥१॥ बहुता काळाचें तेथें एक लिंग । होतें भूमिभाग होऊ-नियां ॥२॥ भोळा महादेव तेणें संतोषला । ह्मणे करी मला कोण पूजा ॥३॥ नामा ह्मणे पाहे निमित्याची वाट । पुराणीं बोभाट असे त्याचा ॥४॥