भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर

lagali unmani vairagyache dhuni | jaga niranjanin nirantar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर ॥१॥ भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें । अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं ॥२॥ औटहातध्वनी चित्तवृत्ती जेथें । उजळली ज्योत चैतन्याची ॥३॥ नामा म्हणे देवा करा सावधान । नाहीं देहभान ज्ञानदेवा ॥४॥